स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पथकाचा अजिंक्य, अनामिक हिमशिखरावर विजय
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 50 व्या आत्मार्पणस्मृतीवर्षानिमित्त स्वा. सावरकर राष्टीय स्मारक,मुंबई यांच्या वतीनेअनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे हिमालयातील अजिंक्य,अनामिक शिखरावरील गिर्यारोहण मोहिम. हिमाचल प्रदेशातील बातलपासून जवळच असलेल्या "कर्चा नाला" परिसरातील6,060मीटर /19,881 फुट उंचीच्या एकाअनामिकहिमशिखराची तसेच देशभरातील 7 उत्कृष्ट गिर्यारोहकांची या मोहिमेकरीता निवड करण्यात आली होती. 10 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईतून रवाना झालेल्या या पथकातील देवेंद्र गंद्रे(मोहिमनेता), आनंद शिंदे (उपनेता), छायाचित्रकार राहूल दंडवते, दिलीप साहू (कोलकाता) आणि संदिप शेटटी् (कर्नाटक) या5गिर्यारोहकांनी 23 ऑगस्ट रोजीहेहिमशिखर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर करण्यात यश मिळविले. स्मारकाचे सह कार्यवाह राजेंद्र वराडकर (संघव्यवस्थापक) व कुर्ला विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीरंग नाडगौडा (तळशिबीरप्रमुख) हेही या मोहिमेत सहभागी झाले होते.
शिखर पादाक्रांत केल्यावर आपल्या राष्ट्रध्वजासोबतच मादाम कामा यांनी स्टुटगार्ड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकविलेला, स्वा. सावरकर संकल्पित भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला राष्ट्रध्वज देखील तेथे फडकविण्यात आला. हिवाळा ऋतू ऐन तोंडावर असतांना,अत्यंत धोकादायकरीत्या खालावलेले तपमान, अनेक प्रकारचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोके यांचा या पथकाला सामना करावा लागला. या अजिंक्य हिमशिखरावरील चढाईचा मार्ग हा या परिसरातील इतर शिखरांच्या तुलनेत अत्यंत धोकादायक असल्यामुळेच नमूद हिमशिखर आजपर्यंत अजिंक्य राहिले होते. विदेशी गिर्यारोहकांपैकी जपान आणि सिंगापूर येथील पथकांनी या खोऱयात अनेक मोहिमांद्वारे येथील अनेक हिमशिखरांवर यश मिळविले होते. परंतू प्रस्तुत हिमशिखरावरील आरोहणमार्गाची दुर्गमता आणि चढाईच्या मार्गावरील धोके इतरांपेक्षा जास्त असल्यामुळेयाशिखरावरील चढाईचे आव्हान कोणी स्विकारले नव्हते.
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य व महत्वाकांक्षी मोहिमेलामिळालेल्या यशामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे. भारत सरकारच्या वतीने गिर्यारोहण मोहिमांचे नियंत्रण करणाऱया इंडियन माउंटेनिअरिंग फाऊंडेशन, नवी दिल्ली तसेच सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याशी सल्लामसलत आणि आवश्यक सोपस्कारानंतर सदर हिमशिखरालास्वा. सावरकर यांचे नांव देण्याबाबतची औपचारिक पूर्तता लवकरच पूर्ण केली जाईल अशी माहिती स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह श्री. रणजित सावरकर यांनी दिली आहे.
|