प्रिय देवेंद्र यांस
आमची हिमश्री ट्रेक्स अँड टुर्स सोबत दिनांक १६ ते २१ जानेवारीची अंदमान सहल अतिशय सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशीच झाली. अंदमान येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय छान होती.
देवेंदनी सहलीतील प्रत्येकाची जातीने विचारपूस करून अंदमानच नयनरम्य दर्शन घडवलं. आमच्या ग्रुपमधे बहुतांश जेष्ठ नागरीक आणि (मी स्वतः एका पायाने अपंग असतांना )देवेंद्र यानी आमची सर्वांची व्यवस्थित काळजी घेतल्या मुळे आम्हाला काहीही अडचण किंवा त्रास जाणवला नाही.
पूर्वनियोजित कार्यक्रमाव्यतिरिक्त शेवटच्या दिवशी एका खास कार्यक्रम हॉटेलमधे आयोजित करून आम्हाला एका सुखद धक्का दिला.
देवेंद्रच्या कौशल्यपूर्ण आणि सुंदर आयोजनामुळे माझ्या आणि इतर सहप्रवाशांच्या ही सहल कायम स्मरणात राहील. मी अपंग असताना त्यांच्या मदतीने समुद्र तळाशी चाललो.(सी वॉल्क -एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी) हा अनुभव माझ्यासाठी आनंदाचा ठरला.
हिमश्री टूर्स चे अनेक धन्यवाद!!!...
भरत आणि सुनेत्रा तळेकर
|