Date: 15th Jan.2017
हिमश्री ट्रेक्स आणि टुर्स ह्यांच्या बरोबर मी गेली तीन एक वर्षे अंदमान, कोस्टल कर्नाटक, कोल्हापूर दर्शन इत्यादी मोठ्या आणि रायगड दर्शन, कासपठार, सफाळे येथील तांदुळवाडी किल्ला अशा एक-दोन दिवसाच्या सहली व ट्रेक्स केले.
देवेंद्र प्रत्येक सहलीत प्रवाशांची जातीने विचारपूस करतात. सहलीत येणारे सहलीचा आनंद लुटण्यास येत आहेत ह्याचे भान देवेंद्राच्या मनात पक्के असते. वेळेचा बाऊ न करता प्रवाशांच्या वेळेप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवतात. जेष्ठ नागरिकांची काळजी घेऊन सर्व घोषित कार्यक्रम पुरा करतात. सहलीत सांगितलेल्या कार्यक्रमाशिवाय नाविन्यपूर्ण कार्यक्रमचे आयोजन करून लोकांना सुखद धक्का देतात. सहल आयोजांसाठी घेतलेल्या पैशाचा पुरेपूर आनंद आपणास मिळतो.
देवेंद्र आणि रुपाली वीर सावरकर राष्टीय स्मारकात कार्यरत आहेत. मुरबाड येथील सावरकर सैनिक शाळेत दोघांचे योगदान आहे. अंदमानच्या सहलीत बहुतेकजण सावरकरांच्या व इतर अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांच्या राहण्यामुळे पुनीत झालेल्या तुरुंगात एक-दोन तास रमतात. स्वतः मी अंदमान येथे गेलो असता देवेन्द्रांची तुरुंगातील मुख्य अधिकारी श्रीमती रशीदा इक्बाल ह्यांच्याशी वैयक्तिक ओळख असल्यामुळे तुरुंगाचे वेगळे दर्शन घडले. अंदमान आणि समुद्र ह्यांचे अतूट नाते आहे. समुद्र दर्शन, समुद्रातील खेळ, पाण्याखालील माशांचे दर्शन कायमचे लक्षात राहील.
सागरी कर्नाटकात जोग धबधब्या व्यतिरिक्त अनेक धबधबे देवेन्द्रामुळे बघावयास मिळाले. कर्नाटकातील जंगल, जंगलातील शेकोटी वरील जेवण मी आणि माझ्याबरोबर आलेल्या सह-प्रवाशांच्या मनात कायमचे लक्षात राहील.
देवेंद्र स्वतः उत्तम गिर्यारोहक असल्यामुळे त्यांच्या बरोबर गिर्यारोहणाची मजा काही औरचआहे. सफाळे येथील तांदूळवाडी सारखा अवघड डोंगरावरची चढाई सोपी झाली. गिर्यारोहणासाठी पहिल्यांदाच आलेल्यांना देवेन्द्रामुळे गिर्यारोहणाचे वेड लागते. आपलं महानगर ह्या दैनिकाचा कार्यकारी संपादक श्री संतोष म्हाळकर प्रत्येक गिर्यारोहणात सहभागी होतात आणि त्यांवरवर लेख लिहतात.
कोल्हापूर येथील ऐतिहासिक स्थळाचे दर्शन घडविण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम सहल आयोजकांच्या यादीत देवेंद्राच्या हिमश्रीचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. "महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने" (MTOA) देखील गिर्यारोहणातील कामगिरी बद्दल देवेंद्रचा सत्कार केला. हिमश्री बरोबर मी कोल्हापूर येथील देवळे, किल्ले, पुरातन शिल्प ह्याचे दर्शन घेतले.
अनेक वर्षे अज्ञात असलेले खिद्रापूर येथील कोपेश्वरचे मंदिर हा पुरातन शिल्प कलेचा उत्तम नमुना आहे. वास्तूशास्त्र आणि शिल्पकलायांचा सुरेख संगम मंदिरात पहावयास मिळतो. मंदिर दीड हजार वर्षांपूर्वीचे काळ्या कातळात कोरले आहे. ह्या मंदिराच्या अप्रतिम कोरीव कामामुळेच "कट्यार काळजात घुसली" चित्रपटाचे चित्रण येथे झाले आहे. दाजीपुर येथील घनदाट जंगल आणि तेथील वनस्पती पक्षीदर्शन देवेंद्राच्या हिमश्रीमुळे शक्य झाले. ढोलताशे वाजून संदेश वहनाचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला. पन्हाळा किल्ल्यातील मुसलमान मार्गदर्शक नखशिखांत शिवप्रेमी असल्यामुळे किल्ल्याचे बारकावे कळले. इंग्रजांच्या धनाच्या हव्यासामुळे आपल्या वास्तुशास्त्राचे किती नुकसान झाले ह्याची प्रचीती येते. कोल्हापुरातील सर्व स्थळातील मार्गदर्शक आणि देवेंद्रह्याच्या योगदानामुळे कोल्हापूर दर्शन सहल अविस्मरणीय झाली
आमच्याबरोबर आलेल्यांनी नावाजलेल्या यात्रा कंपनी ऐवजी देवेंद्रच्या हिमश्री वर डोळे झाकून वैयक्तिक सहली आयोजित करून घेतल्या हीच त्यांच्या यशाची पावती आहे. मी आणि माझी पत्नी देवेन्द्रास अजून यश लाभो अशीच प्रार्थना करतो.
|